साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं | |
| जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं! |
मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं... | |
| आपला दिवस होतो जेंव्हा जाग आपल्याला येते आपली रात्र होते जेंव्हा झोप आपल्याला येते झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं! |
पिठलं भाकरी मजेत खायची जशी पक्वान्नं पानात आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह रानात! आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं | |
| असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं! आपणच आपलं चांदणं बनून घरभर शिंपत रहायचं |
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं | |
साधं सोपं आयुष्य
ReplyDeleteसाधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
.
.
.
mast re Shailya...kp it up